मा.शिक्षणाधिकारी, जिप. नांदेड.

मा.शिक्षणाधिकारी जि.प. नांदेड श्री शिवाजीराव खूडे साहेब उद्या दि.31 डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. सेवानिवृती म्हटली की, कार्यालयात हार, तूरे , शाली व शुभेच्छा यांचा वर्षाव होत असतो मात्र असा कोणताही मोठेपणा मला आवडत नाही म्हनून त्यांनी कार्यालयीन व इतर कर्मचाऱ्यांचा कोणताही कार्यक्रम घेण्यास नकार दिला. कारण पूर्वीपासूनच साहेबांचे व्यक्तीमत्त्व मॅन ऑफ फीव वर्डस् and more deeds असेच आहे. सकाळी नऊ पासून ते सायं९पर्यंत नित्यनेमाने हजर राहणारे एकमेव शिक्षणाधिकारी म्ह०ून त्यांचे नाव सर्वजण घेतात. नोकरी कशी आत्मीयतेने, शिस्तीने, झोकून देवून करावी हे साहेबांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले . शैक्षणिक क्षेत्रातील कोणतीही समस्या अभ्यासपूर्वक सोडण्याचे अनोखे कौशल्य साहेबांना जमलेले आहे.किनवट येथे गट शिक्षणाधिकारी असताना डोंगरदऱ्यातील सर्वात अवघड असणाऱ्या शाळेला भेटी देवून ज्ञानाची शिदोरी डोंगरमाथ्यावर पोहचण्याचे कार्य साहेबांनी केले आहेत. म्हणून आजही साहेबांचे नाव मोठया आदराने तेथे घेतात.
            नांदेड जिल्हयाचे शिक्षणाधिकारी पद भूषवित असताना शिक्षकांचे सर्व प्रकारच्या समस्या अग्र पसंतीने सोडविल्या, चार वर्षाचा गुरु गौरव कार्यक्रम, शंकरराव चव्हाण सभागृहात घेऊन सर्वांना चकीत करुन सोडले. तिथेच साहेबांचाही मातोश्रीशांताबाई जवळगावकर व प्राचार्य रा.ऱ. बोराडे यांच्या शुभहस्ते खुडेसाहेबांचा गौरव करण्यात आला. श्री बाबूराव पुनरवाड यांनी पुढाकार घेवूनच हा योग साधला आहे. त्यांचे शतशः आभार. गुरू गौरव पुरस्कार सोहळा, चांगला पार पडला तो फक्त साहेबांच्या योग्य व त्वरीत निर्णयामुळे, म्हणून आज सर्व शिक्षक वृंद साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उत्साही आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक वसा लाभलेले खुडे साहेब इतरांना सहाय्य करतांना कधीही चूकीचे, दिशाभूल करणारे, डळमळीत मार्गदर्शन केलेले नाहीत, हे साहेबांच्या व्यक्तीमत्वाचे एक वैशिष्टये आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्व शिक्षकांना एक ज्ञानाची शिदोरी वाटत असे, अशा बहुआयामी , बहुश्रूत, खंबीर नेतृत्वास सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहेबांचे नव वर्ष सुखसमृध्दीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थणा... नाना पांचाळ, मुअ जि पहा गर्ल्स, किनवट.

Comments